होशेय 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इस्राएलाचे पाप म्हणजे आवेनाची उच्च स्थाने नाश पावतील; त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे व काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, ‘आम्हांला झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आमच्यावर पडा.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्राएलाची पापे नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा नाश केला जाईल— हे इस्राएलचे पाप आहे. काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील. मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” Faic an caibideil |
हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो