Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राईम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्राएल लज्जीत होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:6
22 Iomraidhean Croise  

अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील, त्याचीच युक्ती त्याचा निःपात करील.


तुमच्या आवडीची जी एलाची झाडे त्यांविषयी ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते त्यासंबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल.


म्हणून फारोचा आश्रय तुम्हांला लज्जेस कारण होईल, व मिसराच्या छायेत लपणे तुम्हांला फजितीस कारण होईल.


ते सर्व लज्जित व फजीत झाले आहेत; एकंदरीने मूर्तिकारांची फजिती उडाली आहे.


आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल.


तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.


तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही, ह्याकरता तू अश्शूर्‍यांबरोबरही शिंदळकी केलीस; हो, त्यांच्याबरोबर तू शिंदळकी केलीस तरीही तुझी तृप्ती होईना.


तुम्हांला आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल; तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये ह्यांमुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल.


तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.


वार्‍याने त्यांना आपल्या पंखांत लपेटून टाकले आहे; ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.


जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


कारण हेही इस्राएलाकडूनच झाले; कारागिराने ते (वासरू) केले, ते देव नाही; ह्या शोमरोनाच्या वासराचे तुकडे-तुकडे होतील.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan