Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 बेथ-आवेनाच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील; तेथले लोक त्याच्याविषयी शोक करतील, त्याचे पुजारी जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत ते आता त्याकरता विलाप करतील, कारण ते त्यांना अंतरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:5
20 Iomraidhean Croise  

तथापि नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएल लोकांना ज्या पापकर्मांच्या योगाने पाप करायला लावले ती पापकर्मे, अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे ह्यांचा नाद येहूने सोडला नाही.


त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली.


जितके पुजारी यहूदाच्या राजांनी यहूदी नगरांच्या उच्च स्थानी व यरुशलेमेच्या आसपासच्या उच्च स्थानी धूप जाळण्यासाठी नेमले होते ते आणि जे कोणी बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण ह्यांना धूप जाळत होते ते सर्व राजाने काढून टाकले.


यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तींसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तींसाठी आपलेच याजक नेमले.


आता दाविदवंशजांच्या हाती असलेले परमेश्वराचे जे राज्य त्याच्याशी तुम्ही विरोध करण्याचा विचार मांडला आहे; तुम्ही एकत्र होऊन तुमचा एक मोठा समुदाय झाला आहे आणि यराबामाने जी सोन्याची वासरे तुमचे देव व्हावेत म्हणून बनवली ती तुमच्याजवळ आहेत.


ती एकदम वाकली, खचली आहेत; त्यांना हे ओझे सावरता आले नाही. ती स्वत:च पकडून नेण्यात आली आहेत.


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”


गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा.


हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.


एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.


“ज्या दिवशी इस्राएल घराण्याचा त्यांच्या अपराधांबद्दल मी समाचार घेईन तेव्हा बेथेलच्या वेद्यांचा समाचार घेईन; वेदीची शिंगे तोडली जाऊन ती भूमीवर पडतील.


“मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन;


ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे, तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते तिचे देऊळ क:पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.”


बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले.


तो म्हणाला, “मी स्वतःसाठी केलेले देव व माझा पुरोहित तुम्ही घेऊन चाललात; माझे आता काय राहिले आहे! आणि वर मला विचारता की, काय झाले?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan