Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते फक्त वचने बोलतात, खोट्या प्रतिज्ञा करतात, करार करतात, म्हणून शेताच्या तासात विषवल्ली उगवते तसे त्यांच्यासाठी प्रतिफळ उगवेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते अनेक अभिवचने देतात, खोट्या शपथा घेतात आणि करार करतात; त्यामुळे नांगरलेल्या शेतात उगविलेल्या विषारी तणाप्रमाणे खटले सुरू होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:4
16 Iomraidhean Croise  

कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.


न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,


घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे.


कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते.”


निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते.


आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कूळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा! कोण जाणे! विष व कडूदवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल!


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी,


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan