Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हांला असे होईल; प्रभातकाळी इस्राएलाचा राजा नाश पावेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुझ्या अती दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल, कारण तुझी दुष्टता फार अधिक आहे. तेव्हा त्या दिवशी सकाळच्या प्रहरी इस्राएलाच्या राजाचा पूर्णरीतीने नाश केला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:15
8 Iomraidhean Croise  

आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


आता ते निश्‍चये म्हणतील, “आम्हांला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही; राजा आमच्या काय कामाचा?”


बेथ-आवेनाच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील; तेथले लोक त्याच्याविषयी शोक करतील, त्याचे पुजारी जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत ते आता त्याकरता विलाप करतील, कारण ते त्यांना अंतरले आहे.


शोमरोन नाश पावला आहे, त्याचा राजा पाण्यावर तरंगणार्‍या ढलप्यासारखा आहे.


इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.


तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही! पाप ते पापच दिसावे, म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठायी मरण घडवणारे असे झाले, आणि आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan