Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:14
21 Iomraidhean Croise  

मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल.


त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली.


अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूराच्या राजाच्या हातून सोडवला आहे?


एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हांला असे होईल; प्रभातकाळी इस्राएलाचा राजा नाश पावेल.


शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.


“ज्या दिवशी इस्राएल घराण्याचा त्यांच्या अपराधांबद्दल मी समाचार घेईन तेव्हा बेथेलच्या वेद्यांचा समाचार घेईन; वेदीची शिंगे तोडली जाऊन ती भूमीवर पडतील.


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, ह्याने भूमीला हात लावताच ती विरघळते आणि तिच्यावरील सर्व रहिवासी शोक करतात; तिला नील नदीप्रमाणे पूर येईल; मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल.


तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन;


तरी ती हद्दपार झाली, तिला बंदिवान करून नेण्यात आले; तिची मुले रस्त्यांच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली; तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व महाजनांना साखळ्यांनी बांधण्यात आले.


पहिल्या बाराच्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडाप्रमाणे तुझे सर्व दुर्ग होतील; झाडे हलवली म्हणजे अंजीर खाणार्‍याच्या तोंडी पडतात.


ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan