Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता. त्याने स्वतःसाठी फळे आणली. जसे त्याचे फळ वाढले, तसे त्याने आणखी वेद्या बांधल्या; जसा त्याचा देश समृद्ध झाला, तसे त्याने त्याच्या पवित्र दगडांना सुशोभित केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:1
24 Iomraidhean Croise  

त्यांनी प्रत्येक उंच टेकडीवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली उच्च स्थाने, स्तंभ आणि अशेरा मूर्ती स्थापल्या.


हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे; यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी म्हणजे अर्थात बआलमूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडल्या आहेत.


इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”


तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.


गिलाद मूर्तिपूजक बनला आहे ना? तर तो शून्यवत होऊन जाईल; गिल्गालात त्यांनी बैल अर्पण केले; त्यांच्या वेद्या शेतांच्या तासांतील दगडांच्या राशींसारख्या आहेत.


एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले; ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले.


आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.


तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2


कारण एफ्राइमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत; ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत.


त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत; त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यासाठी माझी संमती नव्हती; केवळ नष्ट होण्याकरताच त्यांनी आपणांसाठी आपल्या सोन्यारुप्याच्या मूर्ती केल्या.


तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.


कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे.


तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;


Lean sinn:

Sanasan


Sanasan