Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वर होशेयला म्हणाला, त्याचे नाव इज्रेल ठेव, कारण काही वेळानंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा करणार आहे व इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 1:4
32 Iomraidhean Croise  

अहाबाचे सत्तर पुत्रपौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडील जनांपैकी जे अधिकारी होते त्यांना आणि अहाबाच्या पुत्रांचे पालन करणे ज्यांच्याकडे होते त्यांना पत्रे लिहून शोमरोनास पाठवली; त्यांत असे म्हटले होते :


परमेश्वराने एलीयाला सांगितले होते त्या वचनानुसार येहूने शोमरोनास येऊन अहाबाचे जितके लोक तेथे उरले होते त्या सर्वांचा वध करून अहाबाला नामशेष केले.


इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.


यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी जखर्‍या बिन यराबाम इस्राएलावर शोमरोनात राज्य करू लागला; त्याने सहा महिने राज्य केले.


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


सकाळी पशहूराने यिर्मयाला खोड्यांतून काढून बाहेर आणले, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला, “परमेश्वराने तुझे नाव पशहूर नव्हे तर मागोर-मिस्साबीब (चोहोकडे दहशत) ठेवले आहे.


ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्‍या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो.


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


त्यांनी तिला नग्न केले, तिचे पुत्र व कन्या ह्यांचे हरण केले, आणि तिला तलवारीने मारून टाकले; तिचे नाव स्त्रियांच्या तोंडी झाले; कारण त्यांनी तिला शासन केले.


तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस म्हणून मी तिच्याप्रमाणे तुझ्याही हाती पेला देईन.


ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही.


तेव्हा परमेश्वर म्हणाला, “ह्याचे नाव लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ठेव; कारण तुम्ही माझे लोक नव्हत व मी तुमचा नव्हे.”


बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो.


पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे2 ऐकतील.


माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील.


पाहा, प्रभू परमेश्वराचा डोळा ह्या पापिष्ट राज्यावर आहे; मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन; याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही,” असे परमेश्वर म्हणतो.


तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”


देवदूताने त्याला म्हटले, “जखर्‍या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव.


पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव.


त्याने पाटी मागवून ‘ह्याचे नाव योहान आहे,’ असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले.


त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”


त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल, कसुल्लोथ व शूनेम;


Lean sinn:

Sanasan


Sanasan