Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया, आणि इस्राएली राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 1:1
26 Iomraidhean Croise  

योवाश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि यराबाम त्याच्या गादीवर बसला; योवाशाला शोमरोनात इस्राएलाच्या राजांबरोबर मूठमाती दिली.


यहोआश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला शोमरोनात इस्राएलाच्या राजांमध्ये मूठमाती देण्यात आली; त्याचा पुत्र यराबाम हा त्याच्या जागी राजा झाला.


यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा यराबाम बिन योवाश शोमरोनात राज्य करू लागला; त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.


इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जीया राज्य करू लागला.


परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेणेकरून तो आमरण कोडी झाला; तो निराळ्या घरात राहत असे. राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्यायनिवाडा करत असे.


अजर्‍या3 आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला.


योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या.


आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.


सहाशे बैल व तीन हजार शेरडेमेंढरे एवढे वाहिलेले पशू होते.


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही.


यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले.


परमेश्वराचे वचन मला आले ते असे :


खास्द्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बूजीचा पुत्र यहेज्केल याजक ह्याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले; तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर आला.


पथूएलाचा पुत्र योएल ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :


अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,


यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :


दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, - आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही -


तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की, “जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला ‘माझी प्रिय’ म्हणेन.”


कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan