Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजकगण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केली असता याजक धार्मिक विधी करण्यास पहिल्या मंडपात नियमितपणे जात असत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत,

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 9:6
9 Iomraidhean Croise  

साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला; त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले आणि त्याचे पवित्रस्थान पाडून टाकले.


लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी, म्हणून त्यांनाही आपल्याबरोबर घे; पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे.


आणखी तू त्यांना सांग, परमेश्वराप्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पायचे ते हे : नित्य होमार्पणासाठी रोज एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे.


ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;


ह्यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती तर ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या’ निराळ्या ‘याजकाचा’ उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या ‘संप्रदायाप्रमाणे’ म्हटलेले नसावे ह्याचे काय अगत्य राहिले असते?


Lean sinn:

Sanasan


Sanasan