इब्री 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यात सोन्याचे धुपाटणे व चहूबाजूंनी सोन्याने मढविलेली कराराची पेटी होती; ह्या पेटीत मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, पालवी फुटलेली अहरोनची काठी व कराराच्या दोन पाट्या होत्या Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यात सोन्याची धूपवेदी सोन्याने आच्छादलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना असलेले एक सुवर्णपात्र, अंकुर फुटलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. Faic an caibideil |