Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण मंडपामध्ये खोल्या तयार केल्या होत्या, बाहेरील खोली त्यास पवित्रस्थान असे म्हणले आहे. त्यामध्ये दिव्यांचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दीपस्तंभ, टेबल व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्र स्थान म्हटले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 9:2
21 Iomraidhean Croise  

तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनव; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.


आणि मेजावर माझ्यापुढे समक्षतेची भाकर नित्य ठेवावी.


आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास; हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा; त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत;


निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचे तयार करावेत व त्यांवर कुशल कारागिरांकडून करूब काढवावेत.


अंतरपट आकड्यांत लटकवून त्याच्याआड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा; तुमच्याकरता हा अंतरपट पवित्रस्थान व परमपवित्रस्थान ही अलग करील.


आणि त्या अंतरपटाच्या बाहेर निवासमंडपाच्या उत्तर बाजूला मेज ठेवावे. दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.


त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्‍हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत,


मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टींप्रमाणे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे कर; सात दिवसांपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.


“पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.


मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.


म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला, आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय?


दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.


आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan