Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांच्यासह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत. ते नवीन व्यवस्था प्रस्थापित होईपर्यंत लावून दिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 9:10
32 Iomraidhean Croise  

मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल;


अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दाराजवळ नेऊन आंघोळ घाल.


तेव्हा मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! पाहा, मी कधी विटाळलो नाही; मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही; अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही.”


वस्त्र, त्याचा ताणा किंवा त्याचा बाणा किंवा चामड्याची कोणतीही वस्तू धुतल्यावर त्यावरील तो चट्टा नाहीसा झाला तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी म्हणजे ती शुद्ध होईल.


मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे.


त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा; तागाचा चोळणा आपल्या अंगात घालावा; तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदील घालावा; ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावीत.


म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


तर त्याने द्राक्षारस व मद्य हे वर्ज्य करावे. द्राक्षारसाचा किंवा मद्याचा शिरकाही पिऊ नये, द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये, एवढेच नव्हे तर ताजी किंवा सुकवलेली द्राक्षेसुद्धा खाऊ नयेत.


बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्‍याच दुसर्‍या रूढी ते पाळतात.


पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता?


ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.


त्याने आपल्या देहाने वैर, म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले; ह्यासाठी की, स्वत:च्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी;


मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वांत जवळच्या असलेल्या नगरातील वडीलवर्गाने त्या खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावेत;


पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे.


तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.


म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही.


आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.


आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्‍या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली,


कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते.


पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan