इब्री 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
11 तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला, आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला, शिकवणार नाही. कारण त्यांतील लहानांपासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील;
11 तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
11 तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे कोणीही आपल्या सहनागरिकाला सांगणार नाही आणि कुणालाही आपल्या बंधूला शिकवावे लागणार नाही; कारण त्यांतील लहानापासून थोरापर्यंत, सर्व मला ओळखतील;
हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.
जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.
हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्या अशा त्या महानदाच्या पश्चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे.
देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”
मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील.
तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.
आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.