Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परंतु जो त्यांच्या वंशातला नव्हता त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्यास त्याने आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 परंतु मलकीसदेक त्यांच्या वंशातला नव्हता. त्याने अब्राहामकडून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती, त्याला त्याने आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 7:6
16 Iomraidhean Croise  

तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल.”


मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.


कारण तू जगाचा वारस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.


ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;


अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. “संतानांना” असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर “तुझ्या संतानाला” असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.


हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.


‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता;


‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’


श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan