Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 लेवीच्या संतानांपैकी, ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 लेवीच्या संतानांपैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांकडून, म्हणजे अब्राहामच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांकडून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 7:5
15 Iomraidhean Croise  

देव त्याला आणखी म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो; तुझ्यापासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्रसमूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील.


याकोबाच्या वंशातली जी माणसे मिसरात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून सहासष्ट होती.


पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.


मला आणखी असे कळले की लेव्यांना वाटे न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतांवर पळून गेले होते.


याकोबापासून झालेले एकंदर सत्तर जण होते; योसेफ हा मिसरात होताच.


तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


तिसर्‍या वर्षी, म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी, जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा सबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपवशील तेव्हा तो तू लेव्याला, उपर्‍याला, अनाथाला व विधवेला दे म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील;


हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो.


कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan