Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 ह्या फरकामुळे तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 7:22
17 Iomraidhean Croise  

मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन.


माझ्या बापाजवळ ह्या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे; मी म्हणालो की, मी ह्याला आपणाकडे परत आणले नाही, तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन.


तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस.


जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव.


माझ्या मुला, जर तू आपल्या शेजार्‍याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिलास,


निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.


तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील; उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”


हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.


तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे.


त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.


मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’


ते पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे;


त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan