Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पण जी भूमी काटेकुसळे उपजवते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट जाळण्यात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिती असते; तिचा अग्नीने नाश होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पण जी जमीन काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट अग्नीने होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते, ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आहे; तिचा अंत जळण्याने होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 6:8
26 Iomraidhean Croise  

तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;


त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले; तो म्हणाला, “जी भूमी परमेश्वराने शापित केली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट ह्यांविषयी हा आमचे सांत्वन करील.”


जो कोणी त्यांना धरू पाहील त्याला लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे; ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील.”


तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.


सुपीक जमिनीची तेथे राहणार्‍यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करतो.


माझ्या ठायी राग कसला तो नाहीच; माझ्यापुढे युद्धात काटे व काटेरी झुडपे असती तर ती मी पायाखाली तुडवून सर्व जाळून टाकली असती;


तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश ह्यांत तो वस्ती करील.


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


दक्षिणेतील वनास सांग, परमेश्वराचे वचन ऐक; प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्यात अग्नी पेटवीन, तो तुझ्यातले प्रत्येक हिरवे झाड व प्रत्येक शुष्क झाड भस्म करील; धगधगणारी ज्वाळा विझायची नाही आणि तिच्या योगे दक्षिणोत्तर सर्व मुखे पोळतील.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.


ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.


तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.


तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.”


कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.


परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसर्‍या देशात त्यांना फेकून दिले, हे आज आपण पाहतच आहोत.’


तर न्यायाची आणि विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच.


तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नाकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्‍चात्तापाची संधी त्याला मिळाली नाही.


ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan