Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणार्‍यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 जी जमीन आपल्यावर वारंवार पडलेला पाऊस शोषून घेते व लागवड करणाऱ्याला उपयोगी असे पीक देते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 6:7
17 Iomraidhean Croise  

तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले.


त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे;


जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.


त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल.


कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन; मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन.


मी त्यांना व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळांना मंगलदायक करीन; पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन; मंगलदायक वृष्टी होईल.


तुम्ही आपणांसाठी नीतिमत्त्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने येऊन तुमच्यावर नीतिमत्त्वाची वृष्टी करावी ह्याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.


पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.


कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.


श्रम करणार्‍या शेतकर्‍याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.


अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan