इब्री 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 प्रमुख याजकपदाचा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे, त्याला तो मिळतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो. Faic an caibideil |
त्यांनी उज्जीया राजाला प्रतिकार करून म्हटले, “हे उज्जीया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे; अहरोनाचे वंशज जे याजक, ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्रस्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस; अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”