Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वत: दुर्बलतेने वेष्टलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तो स्वतः निर्बलतेच्या अधीन असल्यामुळे अज्ञानी व भटकलेल्या लोकांबरोबर सौम्यतेने वागू शकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 5:2
24 Iomraidhean Croise  

ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


भ्रांत मनाचे लोक सुज्ञान पावतील व कुरकुर करणारे नीतिशिक्षण घेतील.”


मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.”


परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”


मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.


अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वत:विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.


तुम्हांला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हांला ठाऊक आहे;


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;


आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.


परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.


माझ्या बंधूनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले,


कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.


तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan