Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 वास्तविक एवढ्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होते, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 5:12
23 Iomraidhean Croise  

त्या काळात अहीथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे; दावीद व अबशालोम ह्या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे.


परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्‍चय केला होता.


मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.


ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.


“अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैशावाचून व मोलावाचून द्राक्षा-रसाचा व दुधाचा सौदा करा!


तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”


ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”


रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.


सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती.


तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्‍यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो;


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.


ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;


पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली;


ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायचे आहे; ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात.


कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे;


तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्‍चात्ताप, देवावरचा विश्वास,


‘प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे,’ तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्‍या दुधाची इच्छा धरा.


भाषण करणार्‍याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्‍याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan