Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 प्रत्येक प्रमुख याजक माणसांमधून निवडलेला व देवविषयक गोष्टींबाबत माणसांकरिता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही अर्पण करावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 प्रत्येक महायाजक परमेश्वर विषयक गोष्टींबाबत लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व पापांसाठी देणग्या आणि यज्ञे अर्पण करण्यासाठी निवडला जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 5:1
17 Iomraidhean Croise  

“तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्‍हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन


मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”


ह्यावरून देवाच्या गोष्टींसंबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो.


कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,3 शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;


प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो;


परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’


विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.


प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.


तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत.


तो मंडप वर्तमानकाळी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan