Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, ‘हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत बहकलेल्या अंतःकरणाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग ओळखले नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 3:10
20 Iomraidhean Croise  

म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.


कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1


ह्यासाठी की, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे.


कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले!


आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.


चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला; मी म्हणालो, “हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत; ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत;”


हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्‍न विचारतात; त्यांची काठी त्यांना शकुन सांगते; कारण अनाचारबुद्धीने त्यांना बहकवले आहे, परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे.


ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


पण मी तुम्हांला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे?


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan