Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 आपल्या पूर्वजांकरिता देवदूतांद्वारे सांगितलेले वचन जर खरे ठरले आणि प्रत्येक उ्रंघनाची व आज्ञाभंगाची यथान्याय्य शिक्षा मिळाली,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 2:2
29 Iomraidhean Croise  

देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत, प्रभू सीनायवरून पवित्रस्थानी आला आहे.


ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला.


कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे ऐंशी लोक मेले.


तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्यांच्या दंशाने इस्राएलातील बरेच लोक मेले.


तरी मरीने चोवीस हजार लोक मेले.


अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.”


तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले.


जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणार्‍या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही तो मनुष्य प्राणास मुकावा; अशा प्रकारे इस्राएलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावीस.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करताना आढळून आले,


तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.


‘जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.


मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता ‘त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.’


म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.


‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.


आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


तुम्हांला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हांला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे; ते हे की, प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले, आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan