Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही सर्व बाबतीत त्यांच्यासारखा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला त्याने स्वत:च्या मरणाने नेस्तनाबूद करावे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 2:14
32 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्‍यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे.


येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.


कारण ख्रिस्त ह्यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.


कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली;


आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे,


बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.


परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.


त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.


म्हणून तो जगात येतेवेळेस म्हणाला, “यज्ञ व अन्नार्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस;


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.


ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan