Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” तसेच, “पाहा, मी व देवाने मला दिलेली मुले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आणि पुन्हा तो म्हणतो, मी परमेश्वरावर भरवसा ठेवीन. तसेच तो पुढे म्हणतो, पाहा, देवाने मला दिलेल्या मुलांसह मी येथे हजर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 2:13
16 Iomraidhean Croise  

एसावाने दृष्टी वर करून बायका व मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याबरोबर हे कोण आहेत?” तो म्हणाला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.”


योसेफ आपल्या बापाला म्हणाला, “हे माझे मुलगे, देवाने मला हे ह्या देशात दिले.” तेव्हा तो म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”


माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस.


पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.


हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे.


परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.


परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.”


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.


‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.”


पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही.


कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan