Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 ज्याने सर्व काही निर्माण केले व जो सर्व काही अस्तित्वात टिकवून ठेवतो त्या परमेश्वराने पुष्कळ पुत्रांना त्याच्या वैभवात सहभागी करून घेताना त्यांच्या तारणाचा अग्रेसर येशूला दुःखसहनाच्याद्वारे परिपूर्ण केले, हे देवाच्या दृष्टीने उचितच झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 2:10
46 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”


परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.


मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.


पाहा, मी त्याला राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमले आहे


जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात तरी मी आता त्यांना एकत्र करीन, ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील.


तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्‍या दिवशी मी परिपूर्ण होईन.


“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”


ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?”


आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्‍या दिवशी मेलेल्यांतून उठावे,


आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरता.


येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.


आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहोत.


त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.


कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय?


तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो; तुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरता नेमले होते.


तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते;


ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली;


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात.


ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी.


ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.


आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल2 तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.3


ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.


आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.


‘तेथे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे.


असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.


नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.


त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हांला सुवार्ता सांगणार्‍यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वत:साठी नव्हे, तर तुमच्यासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.


तुमच्यातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील,1 ख्रिस्ताच्या दु:खांचा साक्षी व प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो :


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan