Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 2:1
25 Iomraidhean Croise  

परमेश्वराने मोशेला इस्राएलासंबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळशील तर तू कृतार्थ होशील; दृढ हो, हिंमत धर, भिऊ नकोस, कचरू नकोस.


तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.


माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव.


कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


तुम्हांला अजून समजत नाही काय? पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या?


डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय?


चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.


“तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.”


ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले; परंतु येशू मंदिरातून1 गुप्तपणे निघून गेला.


तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल.


मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;


आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस;


आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन.


प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहीत आहे; ह्या दोन्हींमध्ये मी तुम्हांला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan