Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्‍यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 13:4
33 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली;


ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.


तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार ह्याची स्त्री असून ती त्या वेळी यरुशलेमेच्या दुसर्‍या पेठेत राहत होती.


कारण हा कामाग्नी भस्म करून नाशाप्रत नेतो; त्याच्या पायी माझी सर्व मालमत्ता समूळ नष्ट झाली असती.


मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.


स्त्रीशी संभोग करताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


तू आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नकोस.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”


जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.


अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,


जो आपल्या कुमारिकेचे लग्न करून देतो तो बरे करतो; पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करतो.


इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हांलाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?


कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.


देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा,


हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात.


एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


सेवक एका स्त्रीचा पती असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत.


अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.


आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा;


लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील.


म्हणून माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावीत, घर चालवावे आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये.


ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan