Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहोत म्हणून पीडितांची आठवण ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तुरुंगात पडलेल्यांबरोबर तुम्ही तुरुंगात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहात म्हणून पीडितांची आठवण ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 13:3
19 Iomraidhean Croise  

तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.


उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’


परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’


आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की, “ह्याला पहार्‍यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.”


दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.


एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनांत आहे ह्याची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो.


कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.


त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते;


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan