Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 13:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आपला बंधू तीमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हांला कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आपला बंधू तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हास भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 आपला बंधू तीमथ्य ह्याची तुरुंगातून सुटका झाली आहे, हे मी तुम्हांला कळवू इच्छितो. तो लवकर आला, तर मी तुमच्या भेटीस येईन तेव्हा त्याला बरोबर आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 बंधू तीमथ्य हा आता तुरुंगातून सुटला आहे, हे तुम्हाला माहीत असावे, अशी माझी इच्छा आहे; तो इकडे लवकर आला, तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 13:23
10 Iomraidhean Croise  

सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो.


ह्यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशास जाईन;


कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्‍या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;


विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस.


म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नयेस; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे.


आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला : तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्‍या मंडळीला;


त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल1 अशी मला आशा आहे.


मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan