Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 शिस्तीसाठी तुम्ही अडचणी सहन करीत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 12:7
16 Iomraidhean Croise  

मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; त्याने अधर्म केल्यास, मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याला शिक्षा करीन;


“तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.


जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय.


काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस,


बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.


छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते.


तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये.


मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो, तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास ह्यांच्यावर अरिष्ट येईल, हाच तुला इशारा होईल, ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील;


मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan