Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, जे लंगडे त्यास मार्गातून घालवले जाऊ नये, तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आणि सरळ मार्गावर चालत राहा, ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,” म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 12:13
15 Iomraidhean Croise  

गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.


तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.


तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.


प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील,


परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?”


बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.


तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan