Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्‍यात वस्ती होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 11:9
22 Iomraidhean Croise  

मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्‍चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.


मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.


मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.


ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”


तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्‍यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.”


मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्‍यात आहे.”


अब्राहाम हा पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरा म्हणून राहिला.


“मी तुमच्यामध्ये उपरा व परदेशी आहे; माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टिआड करीन.


ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.


तो तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्राहामाला दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरा आहेस, तो तुझे वतन होईल.


लाबानाने याकोबाला गाठले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता; लाबानानेही आपल्या भाऊबंदांसह गिलाद डोंगरात डेरा दिला.


मग किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रेस याकोब आपला पिता इसहाक ह्याच्याकडे गेला; तेथेच अब्राहाम व इसहाक हे पूर्वी वस्तीस होते.


कारण त्याची संपत्ती एवढी वाढली की, त्यांना एकत्र राहण्याची सोयच नव्हती; तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्या-मुळे ज्या देशात ते उपरे होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना.


याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”


त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते.


तुम्ही कधी घरेदारे बांधू नका, शेते पेरू नका, द्राक्षांचे मळे लावू नका, त्यांची मालकीही पत्करू नका; तर आपले आयुष्य तंबूत घालवा, म्हणजे ज्या देशात तुम्ही उपरे आहात त्यात तुमचा बहुत दिवस निभाव लागेल.’


म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan