Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 11:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्‍यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्‍यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 अब्राहाम जणू काही निर्जीव झालेला असतानाही ह्या एकापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 11:12
22 Iomraidhean Croise  

मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”


ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील.


मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;


तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”


माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्‍यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा.


यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.


तथापि दाविदाने वीस वर्षांचे व त्यांहून कमी वयाचे लोक ह्यांची गणती केली नाही. कारण इस्राएलाची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे वाढवीन असे परमेश्वराने म्हटले होते.


तू त्यांचे वंशज आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजांना सांगितले होते, त्या देशात तू त्यांना नेऊन पोचवले.


तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’


कारण हे इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या रेतीइतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल; न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमला आहे.


तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.”


आकाशसैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद ह्याची संतती व सेवा करणारे लेवी ह्यांना मी बहुगुणित करीन.”


तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की, ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे जेथे त्यांना म्हणत, तेथे ‘तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,’ असे त्यांना म्हणतील.


ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.


यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल;


तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला बहुगुणित केले असून आज तुमची संख्या आकाशातील तार्‍यांइतकी आहे.


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही म्हणून आकाशातील तार्‍यांप्रमाणे तुम्ही अगणित झाला तरी थोडके उराल.


तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्रकिनार्‍यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले, त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.


आणि तो ‘पृथ्वीच्या चार कोपर्‍यांतील गोग’ व ‘मागोग’ ह्या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.


त्या खोर्‍यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्‍यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.


तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हांला काही सापडले नाही ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे.” ते म्हणाले, “होय, तो साक्षी आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan