Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून तो जगात येतेवेळेस म्हणाला, “यज्ञ व अन्नार्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 परिणामत: जगात येताना ख्रिस्त देवाला म्हणाला, यज्ञ व अर्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 10:5
26 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


“परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.


लबानोन जळणास पुरायचा नाही व त्यावरील वनपशू होमास पुरे पडायचे नाहीत;


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


हे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


“जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो, “देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.”


त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.


ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”


वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष नव्हता” (ती नियम-शास्त्राप्रमाणे अर्पण करण्यात येतात);


ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan