Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 10:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 10:25
32 Iomraidhean Croise  

मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे; जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील.


मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्‍न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.


नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते.


ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.


मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.


बोध करणार्‍याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्‍याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्‍याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्‍याने ती संतोषाने करावी.


ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते.


सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय?


संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.


तर बांधणार्‍या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.


तो असा की, ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारलाजावा.


तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे.


म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.


म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात.


आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.


कारण “अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;


बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये.


तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.


सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा;


तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.


ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan