Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 10:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 10:22
66 Iomraidhean Croise  

त्याच्यापूर्वी त्याच्या बापाने जी पातके केली त्या सर्व पातकांचे अनुकरण त्याने केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याचे चित्त त्याचा देव परमेश्वर ह्याच्याकडे जसे पूर्णपणे होते तसे त्याचे नव्हते.


युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले पन्नास हजार योद्धे आले; त्यांना व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे.


हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे.


परमेशाचे स्तवन करा!1 सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.


अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.


मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन.


जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!


मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.


मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर.


गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन.


तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन.


मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे.


अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.


हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.


माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन.


न्याय नीतिमानाकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील.


मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल;


माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.


मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील.


इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.”


त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्यासन्निध येईल, कारण माझ्यासन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मी तुला पाण्याने न्हाऊ घातले, तुझ्यावरचे रक्त धुऊन काढले व तुला तेलाने माखले.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून द्यावे;


त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा; तागाचा चोळणा आपल्या अंगात घालावा; तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदील घालावा; ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावीत.


मोशेने अहरोनाला व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.


पाप व अशुद्धता दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमनिवाशांसाठी एक झरा फुटेल.


तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर : पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे.


मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.


ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक


येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.


हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती.


तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’


ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.


तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2


त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत.


अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,


दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;


ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;


तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले.


तर मग ज्या पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.


म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;


त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये.


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.


आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;


कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकर्‍यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले,


पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.


त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता ‘बाप्तिस्मा’ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


Lean sinn:

Sanasan


Sanasan