Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19-20 म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19-20 म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्‍वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 10:19
20 Iomraidhean Croise  

आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.


कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.


त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत.


कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.


तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे राहिले नाही.


म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.


म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक1 होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू;


म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.


ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.


तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.


आणि दुसर्‍या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता;


न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे; कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan