Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 10:11
21 Iomraidhean Croise  

प्रायश्‍चित्तासाठी पापबली म्हणून एक गोर्‍हा दररोज बळी दे आणि वेदीसाठी प्रायश्‍चित्त करून ती शुद्ध कर. ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.


“परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.


हे क्षेत्र पवित्र राहावे; सेवा करण्यास परमेश्वरासमीप जाणार्‍या पवित्रस्थानाच्या सेवकांसाठी म्हणजे याजकांसाठी ते असावे; त्यात त्यांच्या घरांसाठी जागा व पवित्रस्थानासाठी पवित्र जागा असावी.


त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.


नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील.


एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला; त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले आणि त्याचे पवित्रस्थान पाडून टाकले.


असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.


तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील; उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”


“मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय?


ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांशिवाय आणखी हेदेखील अर्पावे.


आणखी तू त्यांना सांग, परमेश्वराप्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पायचे ते हे : नित्य होमार्पणासाठी रोज एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे.


अमावस्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्यांबरोबरची पेयार्पणे ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधिपूर्वक अर्पावे.


तर मग ज्या पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.


कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.


प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत.


त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.


तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर ‘प्रभूने घातलेल्या’ खर्‍या ‘मंडपाचा’ सेवक आहे.


तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan