Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, “तो आपले देवदूत वायू, आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 मात्र देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वारे आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात, “तो वायूला आपले दूत, व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 1:7
10 Iomraidhean Croise  

देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


ते बोलत चालले असता पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले; आणि एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.


अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.


वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस.


त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.


त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.


दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत.


ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan