Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन हालवून सोडीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘थोड्या वेळात मी आकाश, पृथ्वी, सागर आणि कोरडी भूमी पुन्हा हलविणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 2:6
25 Iomraidhean Croise  

तो पृथ्वीस कापवून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात.


तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.


थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही;


कारण थोडक्याच काळाने तुझ्यावरचा माझा कोप शमून माझा क्रोध त्याच्या नाशास प्रवृत्त होईल.


मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


लबानोनाची बाग होण्यास, बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे, नाही काय?


आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलाच्या घराण्याविषयी व यहूदाच्या घराण्याविषयी जे हितकर वचन मी सांगितले ते पूर्ण करण्याचे दिवस येत आहेत.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.


कारण मी ईर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्राएल देशात मोठा भूकंप होईल;


समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशू, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व माणसे माझ्यापुढे थरथर कापतील; पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हरएक कोट कोसळून जमीनदोस्त होईल.


परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.


‘आणि’ वर ‘आकाशात अद्भुते, व’ खाली ‘पृथ्वीवर’ चिन्हे, ‘म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन;


कारण “अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;


लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांतील लोक ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरांत ठेवू देणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan