Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “तुम्ही पुष्कळाची वाट पाहिली, परंतु पाहा! तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली! हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो! कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपआपल्या स्वत:च्या घरात आनंद घेत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “तुम्ही पुष्कळाची आशा केली, परंतु पाहा, तुम्हाला किती थोडेसे मिळाले. तुम्ही जे घरी आणले, मी ते फुंकर घालून उडविले का? सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, कारण माझे भवन ओसाड पडलेले आहे आणि तुम्ही स्वतःच्या घरात व्यस्त आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 1:9
25 Iomraidhean Croise  

दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”


तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.


पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’


मी देवाला म्हणेन, मला दोषी लेखू नकोस; तू माझ्याशी विरोध का करतोस हे मला सांग.


एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो.


अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.


सर्वकाही कष्टमय आहे; कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही; ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही.


गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.


दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”


त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”


मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.


मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


“इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?


तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे.


तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील, पण थोडेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकतील.


तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan