Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा; त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पर्वतावर जा, लाकडे आणा आणि माझे मंदिर बांधा; मग मी त्यामध्ये आनंद करीन आणि मी गौरविला जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पर्वतावर जा आणि लाकडे घेऊन या आणि माझे भवन बांधा. म्हणजे मी त्यात संतोष पावेन आणि गौरवित होईन,” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 1:8
21 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चारशे ऐंशीव्या वर्षी, इस्राएलावरील शलमोनाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, दुसर्‍या म्हणजे जिव नावाच्या महिन्यात शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.


परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील.


तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला जिवेभावे शरण जा. उठा, परमेश्वर देवाचे पवित्रस्थान बांधायला लागा; परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधायचे आहे त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे ठेवायची आहेत.”


ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे; माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील.


त्यांनी पाथरवटांना व सुतारांना पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश ह्याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सीदोनी व सोरी लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात


त्याचे तीन थर मोठमोठ्या पाषाणांचे व एक थर नव्या लाकडांचा असावा; हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा.


ह्या स्थळी मी इस्राएल लोकांना भेट देईन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.


माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.


केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.


म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल व तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल.”


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा.


मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan