Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग परमेश्वराचा निरोप्या हाग्गय ह्याने परमेश्वराचा निरोप लोकांना कळवला; तो म्हणाला, “मी तुमच्याबरोबर आहे,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग परमेश्वराचा निरोप्या, हाग्गय याने, परमेश्वराचा निरोप लोकांस सांगितला आणि म्हणाला; परमेश्वर असे म्हणतो, “मी तुमच्याबरोबर आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 1:13
27 Iomraidhean Croise  

मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.


तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.


ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”


मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


माझ्या सेवकाखेरीज कोण आंधळा आहे? मी पाठवतो त्या माझ्या दूतासारखा कोण बहिरा आहे? माझ्या भक्तासाराखा कोण आंधळा आहे? परमेश्वराच्या सेवकासारखा कोण आंधळा आहे?


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’


तुला ह्या लोकांनांबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन; म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत; कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडवण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.


कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो; कारण ज्या राष्ट्रांतून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन, पण तुझा पूर्ण नाश करणार नाही; तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.


“मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.


हे जरूब्बाबेला, हिम्मत धर,’ असे परमेश्वर म्हणतो; ‘हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर; परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा; मी तुमच्याबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.


परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan