Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर नव्या द्राक्षरसावर व तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशूवर व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 1:11
13 Iomraidhean Croise  

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


ज्या स्त्रीच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, “तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोईस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो ह्या देशात सात वर्षे चालू राहणार आहे.”


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


“यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे.


त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.


ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली, तो निबिड अंधकाराची प्रभात करतो व दिवसाची काळोखी रात्र करतो, जो समुद्राच्या जलांना बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाम परमेश्वर हे आहे.


प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.


तो आकाशात आपल्या मंदिराचे मजले उभारतो, पृथ्वीवर त्याने आपला नभोमंडप स्थापला आहे, तो समुद्राच्या पाण्यास बोलावून ते पृथ्वीच्या पाठीवर ओततो; त्याचे नाम परमेश्वर आहे.


मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो.


कोठारांत काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून ह्यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हांला आशीर्वाद देईन.”


तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्‍यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे.


क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण1 तांबेरा व बुरशी ह्यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan