Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हबक्कूक 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; आणि भांडण व वाद उठतो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




हबक्कूक 1:3
16 Iomraidhean Croise  

मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी पुन्हा निरीक्षण केले; तेव्हा पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.


एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.


नीतिमत्तेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.


मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे ह्याकरताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय?


कारण मी बोलू लागलो की, “जुलूम, लूट!” हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे.


हे मानवपुत्रा, तुझ्याभोवती काटेझुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास तरी त्यांना भिऊ नकोस, त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; ही फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; त्यांच्या चर्येस भिऊ नकोस.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


(तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता);


Lean sinn:

Sanasan


Sanasan