Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील, मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल; कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात मानवाला निर्माण केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 9:6
32 Iomraidhean Croise  

पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे; मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार; आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील, असे होईल.”


रऊबेन त्यांना म्हणाला, “मुलाला काही अपाय करू नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही; पाहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे.”


आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”


तरी तू त्याला निर्दोष समजू नकोस; तू सुज्ञ पुरुष आहेस; त्याचे काय करावे हे तुला समजेलच; त्या पिकलेल्या केसाच्या म्हातार्‍याला रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव.”


अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.


तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली व राजमंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्या वाटेने ती बाहेर गेली; मग तिथे तिला जिवे मारले.


अथल्येस राजमंदिराजवळ तलवारीने वधले, तेव्हा सर्व लोक आनंदित झाले व नगर शांत झाले.


त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याला त्याच्याच वाड्यात जिवे मारले.


तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.


खून करू नकोस.


रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस.


वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो;


पण परमेश्वराच्या निवासमंडपासमोर परमेश्वराला अर्पण करायला तो दर्शनमंडपाच्या दाराशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा;


जर कोणी एखाद्याला ठार मारले तर त्याला अवश्य जिवे मारावे.


तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.


मग मनुष्यवध करणार्‍या त्या मनुष्याला, रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे; आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे.


ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्‍या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्‍चित्त होऊ शकत नाही.


तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.


कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्‍याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.


पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.


तथापि कोणी आपल्या शेजार्‍याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला,


खून करू नकोस.


तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.


जो ‘कैदेत जायचा तो कैदेत’ जातो; ‘जो तलवारीने’ जिवे मारील, त्याला ‘तलवारीने’ मरणे भाग आहे. ह्यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो.


अबीमलेखाने आपल्या सत्तर भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्ट वर्तन केले होते त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले.


शमुवेल त्याला म्हणाला, “तुझ्या तलवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत, त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे तुकडे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan