Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्‍या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 9:5
26 Iomraidhean Croise  

रऊबेन त्यांना म्हणाला, “मुलाला काही अपाय करू नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही; पाहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे.”


तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”


तर तू आपल्या बुद्धीचा उपयोग कर; त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नकोस.


अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.


ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”


त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याला त्याच्याच वाड्यात जिवे मारले.


पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशाच्या लोकांनी जिवे मारले. त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले.


कारण रक्तपाताचा सूड उगवणार्‍यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.


खून करू नकोस.


कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे.


आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या जिवावर उठू नकोस; मी परमेश्वर आहे.


जर कोणी एखाद्याला ठार मारले तर त्याला अवश्य जिवे मारावे.


पशू मारणार्‍याने त्याची भरपाई करावी; पण मनुष्यहत्या करणार्‍याला जिवे मारावे.


तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.


ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा मनुष्याला अवश्य जिवे मारावे.


ज्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.


अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला, तर मारणार्‍याला अवश्य जिवे मारावे; तो खुनी होय; रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने खुनी सापडेल तेथे त्याला जिवे मारावे.


ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा.


आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत;


तथापि कोणी आपल्या शेजार्‍याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला,


तर त्याच्या गावच्या वडीलवर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणार्‍याच्या हाती द्यावे.


अबीमलेखाने आपल्या सत्तर भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्ट वर्तन केले होते त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan